या ब्लॉगविषयी

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेले सर्व लेख या ब्लॉगवर संकलित केले जाणार आहेत. २० ऑगस्ट २०१७ रोजी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला ४ वर्षे होत आहेत. तर २० फेब्रुवारी २०१८ रोजी कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाला ३ वर्षे पूर्ण होत आहेत. दोघांच्याही खुनांचा तपास अजून पूर्ण झालेला नाही. दोन्ही खुनांचे सूत्रधार अजूनही मोकाटच आहेत. याचे दुःख मनात आहेच. पण केवळ दुःख करत बसणे म्हणजे त्यांच्या खुन्यांचा हेतू साध्य होण्यास मदत केल्यासारखे आहे. या दोन्ही महामानवांना कृतीतून अभिवादन करण्यासाठी या ब्लॉगची सुरुवात करत आहोत. डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात लिहिलेले लेख २० ऑगस्ट १०१७ (डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृतिदिन) पासून २० फेब्रुवारी २०१८ (कॉ. गोविंद पानसरे स्मृतिदिन) पर्यंत दररोज एक लेख याप्रमाणे या ‘अंधश्रद्धा विनाशाय’ ब्लॉगवर प्रकाशित होतील. सर्व वाचकांना विनंती आहे की हे लेख जास्तीत जास्त शेअर करावेत. आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात. 
या सर्व लेखांचे संपादक- प्रभाकर नानावटी

1 टिप्पणी:

  1. तुमच्या कार्याला खुप खुप शुभेच्छा ...दाभोल करांना विनम्र अभिवादन.

    उत्तर द्याहटवा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...