रविवार, ८ ऑक्टोबर, २०१७

सौ. अनुराधाबाईंचा दावा दिशाभूल करणारा!



सौ. अनुराधाबाईंचा दावा दिशाभूल करणारा!

दाभोलकर, आव्हान, अनुराधाबाई देशमुख, चमत्कार, अटी
अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्राने सौ. अनुराधा देशमुख (ता. मोहोळ, जि. सोलापूर) या संचार अवस्थेत हातातून विभूती व शिवलिंग काढतात, हा त्यांचा चमत्कार सिद्ध करण्याचे आव्हान दिले आहे. मी ते स्वीकारले, असा दावा या वृत्तपत्रातून करत असून तो पूर्णपणे दिशाभूल करणारा आहे. त्यांनी सही करावयाचे आव्हान मसुदा त्यांना रजिस्टर्ड पत्र पोचपावतीने मिळाले असून आजतागायत त्यांनी ते सही करून परत पाठविले नाही. लोकांच्या माहितीसाठी आज तो प्रस्तुत करत आहोत.

मसुदा :
1.      मी सौ. अनुराधा देशमुख. माझ्या अंगात श्री आदिनाथाचा संचार झाल्यानंतर हातातून निघणारी विभूती व शिवलिंग याबाबत खालील चाचणी देऊन चमत्कार सिद्ध करण्यास तयार आहे.
2.      संचार होण्यापूर्वी माझ्या शरीराची अंतर्बाह्य तपासणी मोहीम ते तज्ज्ञ करतील.
3.      यावेळी अंगावर परिधान करावयाची वस्त्रे व पूजेचे साहित्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुरवेल. ते मी वापरेन.
4.      हा प्रयोग महाराष्ट्रातील कोणयाही जिल्ह्याच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात दोन्ही बाजूच्या निवडक प्रतिनिधींसमोर, प्रमुख वृत्तपत्रांच्या वार्ताहरांसमोर केला जाईल.
5.      कार्यक्रमाची व्हि.डी.ओ.टेप घेण्यात येईल.
6.      अंगाची, वस्त्रांची व पूजासाहित्याची तपासणी केल्यानंतर चाचणी संपेपर्यंत माझ्याव्यतिरिक्त यास अन्य कोणीही स्पर्श करणार नाही.
7.      चाचणी कोणीही जिंकल्यास आणखी एक अंतिम चाचणी देणे वा घेणे याबाबत उभय बाजूला मुभा राहील.
8.      या चाचणीत मी चमत्काराने अंगारा, शिवलिंग निर्माण करू शकल्यास मी चमत्कार करते, हे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जाहीर वा लेखी मान्य करावे.

9.      मी विभूती व शिवलिंग चमत्काराने निर्माण करण्यात अपयशी ठरल्यास, मी हे केवळ चमत्कार नसून हातचलाखी होती, असे लेखी जाहीर करून ते बंद करेन.
10.  या संपूर्ण चाचणीचा खर्च म.अं.नि.स.ने करावयाचा असून चाचणीमध्ये मी अयशस्वी ठरल्यास ती मी त्यांना परत करेन.
11.  वरील सर्व अटी मला मान्य असून याप्रमाणे चाचणी देण्यास मी तयार आहे.
12.  त्यांच्या कोणत्याही भक्ताने या मसुद्यावर याची सही आणून देताच सर्व आव्हानप्रक्रिया ताबडतोब पूर्ण केली जाईल.
आता कोणत्याही सबबी न सांगता सौ. अनुराधा देशमुख यांनी कसोटीच्या रिंगणात यावे अथवा आपला खोटेपणा कबूल करावा.

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र
 (सप्टेंबर १९८८)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ! (उत्तरार्ध)

‘अंनिस’ची एक यशस्वी चळवळ ! (उत्तरार्ध) दाभोलकर, पर्यावरण, गणपती मूर्ती दान, उपक्रम, रूपरेषा , जनहित याचिका, न्यायालयीन आदेश   श...